Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Zashichi Rani Laxmibai by Raghuveersingh Rajput

Zashichi Rani Laxmibai by Raghuveersingh Rajput

Regular price Rs. 117.00
Regular price Rs. 130.00 Sale price Rs. 117.00
Sale Sold out
Condition
Language
Publication
झांसीची राणी! जिच्या केवळ नावानेच आपल्या अंत:करणात स्फुलिंग प्रज्यलित होते, अशी देदीप्यमान स्त्री, महाराणी व लढवय्या! तिचे सगळे आयुष्यच झंझावती होते. (आईविना पेशवांच्या घरात वाढलेली, भातुकलीपेक्षा, मुलांच्या साहस क्रीडांमध्येच रस घेणारी, भारतीय असल्याचा जाज्चल्य अभिमान बाळगतानाच ब्रिटिशांना धूळ चारण्याचे मनोरथ रचणारी मनिकर्णिका, अवघ्या 13 व्या वर्षी महाराणी बनते. महाराणी लक्ष्मीबाई म्हणून प्रजाजनांच्या आदराला पात्र होते आणि राणी म्हणून सगळ्या कसोट्यांवर यशस्वी होण्याचा तिने अखेरपर्यंत प्रयत्न केले. स्त्री असण्याचे कोणतेही भांडवल न करता वा स्त्रीजन्म ही अडचण न मानता आपल्या अफाट शौर्याने ब्रिटिशांना पाणी मागायला लावतानाच अंतर्गत राजकीय व कौटुंबिक कलहांची वादळे कष्टी मनाने तरीही निधड्या छातीने परतून लावते.)
पती गंगाधररावांच्या आकसिक निधनानंतर आलेले वैधव्य धीरोदात्तपणे झेलणारी ‘राणी लक्ष्मीबाई’ परकीयांपासून झांसीचे रक्षण हेच ध्येय उराशी बाळगते व 1857 च्या स्वातंत्र्य समरात सक्रिय भाग घेऊन हौताम्य पत्करते. सारेच विलक्षण आणि चित्तथरारक! तिचा हाच वादळी प्रवास या पुस्तकात अधोरेखित केला आहे. (प्रत्येक वाचकाच्या मनात देशप्रेमाची ज्योत जागविणारे व आपल्या महान इतिहासातील एका महत्त्वाच्या पर्वाचा सांगणारे प्रेणादायी पुस्तक आज 150 वर्षांनंतरही तिची लोकप्रियता कशी अबाधित आहे याचीच साक्ष देते.)
View full details