Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Vistarwadi Chin Ani Bharat By Vijay Naik

Vistarwadi Chin Ani Bharat By Vijay Naik

Regular price Rs. 266.00
Regular price Rs. 295.00 Sale price Rs. 266.00
Sale Sold out
Condition
Language
Publicaion

कॅन ड्रॅगन अँड एलिफन्ट डान्स टुगेदर?
भारत व चीन यांच्या दरम्यानचे संबंध गेली वीसेक वर्षं तसे सलोख्याचे होते. कारण याच काळात देवाण-घेवाण वाढली, व्यापारवृद्धी झाली, सीमावादाबाबत वाटाघाटी चालू राहिल्या. शी जिनपिंग व नरेंद्र मोदी यांच्या परस्परांच्या देशाला भेटी झाल्या. या पार्श्वभूमीवर चीनचे स्टेट कौन्सेलर व परराष्ट्र मंत्री वांग एका पत्रकारपरिषदेत म्हणाले होते की, चिनी ड्रॅगन व भारतीय गजराज यांनी एकमेकांबरोबर भांडायला नको, तर नृत्य करायला हवं…आज मात्र परिस्थिती बदललेली दिसते आहे.
…डिसेंबर १९७८मध्ये डेंग झाव पिंग यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला त्यांच्या पारंपरिक वर्ग संघर्षाच्या वैचारिक बैठकीपासून अलग करून आर्थिक विकासाच्या विचारांकडे वळवलं… जगासाठी अधिक खुलं धोरण अवलंबत चीनने कृषी, उद्योग, लष्कर, विज्ञान व तंत्रज्ञान या चार क्षेत्रांच्या आधुनिकीकरणास प्राधान्य दिलं. विजय नाईक यांच्या पुस्तकात चीनच्या या आर्थिक सुधारणांच्या योजनांची माहिती असून,… चीन हा अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची व्यवस्था कसा बनला, याची कारणमीमांसा व ऊहापोह केला आहे….
चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांचा उदय कसा झाला, कम्युनिस्ट पक्षाच्या अगदी तळागाळापासून अखेर ते पक्षाचे महासरचिटणीस, नंतर चीनचे अध्यक्ष (२०१३) कसे झाले, याचा सुरेख विश्लेषणात्मक आलेख लेखकाने दिला आहे. ते आता चीनचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने चालले आहेत… चीन आता जागतिक सत्ताही बनला आहे…. अमेरिकेला आव्हान देण्याची चीनची अंतःस्थ महत्वाकांक्षा असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात श्रेष्ठत्व प्राप्त करायचं आहे… या परिस्थितीचे भारत व चीनच्या संबंधांवर काय परिणाम होतील? चीनने निर्माण केलेल्या आव्हानाचा भारत कशाप्रकारे सामना करणार?… आशियातील चीनचं वर्चस्व भारत घटवू शकेल काय?अशा अनेक प्रश्नांच्या चर्चेसह डोकलम, गलवान ते लडाख संबंधीचे वाढते तणाव अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्ष विजय नाईक यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे… भारत व चीन दरम्यानच्या घटना व आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची स्पंदन जाणून घेणाऱ्यांसाठी या पुस्तकाची मी नेहमीच शिफारस करेन.
गौतम बंबावाले
माजी सनदी अधिकारी
भारतीय राजदूत म्हणून चीनमध्ये नियुक्त (२०१७-१८

View full details