Sangharshayatra Khristabhumichi by by Father Fransis D’britto
Sangharshayatra Khristabhumichi by by Father Fransis D’britto
Regular price
Rs. 261.00
Regular price
Rs. 290.00
Sale price
Rs. 261.00
Unit price
per
'येशू ख्रिस्त म्हणजे सा-या जगाला दयेचा, शांतीचा संदेश देणारी करूणामूर्ती. पण त्या प्रेषिताची जन्मभूमी आणि कर्मभूमी असणारा पॅलेस्टाइनचा प्रदेश सध्या ज्यू विरूद्ध अरब अशा संघर्षाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. त्या रक्तबंबाळ ख्रिस्तभूमीची व्यथा समजून घेण्याच्या इराद्याने वारंवार त्या प्रदेशाची यात्रा करून आलेल्या एका मानवतावादी ख्रिस्ती भाविकाची साक्षेपी निरीक्षणे नोंदवणारे हे पुस्तक. विसावे शतक व्यापणा-या ज्यू-अरब संघर्षाचा ऐतिहासिक वेध घेता घेता तीन धर्मांच्या श्रद्धांशी निगडीत असणा-या त्या प्रदेशाची आगळी सफरही घडवून आणणारे हे शैलीदार पुस्तक धुमसत्या पश्चिम आशियाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी बहाल करते. '