Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Pruthaviraj Chauhan

Pruthaviraj Chauhan

Regular price Rs. 159.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 159.00
Sale Sold out
Condition
‘चंद बरदाई’ यांच्या ‘पृथ्वीराजरासा’ ह्या चारण भाषेतील काव्यग्रंथाला अभ्यासून त्याचा गुजराथी भाषेत अनुवाद रा.रा.आत्माराम केशवजी द्विवेदी ह्यांनी केला. त्याचा आधार घेऊन पृथ्वीराज चौहान ह्यांचा इतिहास मांडणारे हे मराठीतील एकमेव पुस्तक आहे. प्रथमत: ‘लोकहितवादी’ ह्या मासिकात सन १८८३ साली हा इतिहास प्रसिध्द झाला होता. त्यामुळे ह्या पुस्तकाचे ऐतिहासिक मुल्य फार मोठे आहे. ‘रासा’ म्हणजे इतिहास, चंद भाट ह्यास देवीचा प्रसाद असल्यावरून त्यास ‘चंद वरदायी \बरदायी’ हे नाव पडले. राजस्थान आणि गुजराथ या प्रांतांचा इतिहास अनुक्रमे कर्नल टॉड आणि मिस्टर फॉर्बस ह्यांनी लिहीले. त्यांनी भाट लोकांकडूनच माहिती मिळवून इतिहास लिहीला होता. चंद वरदायी यांचा ग्रंथ फार मोठा आहे. पण ह्या पुस्तकामुळे त्याला सारांश रुपात वाचण्याची संधी मराठी वाचकांना मिळालेली आहे.पुस्तकात तळटीपा देऊन महत्त्वाच्या शब्दांचे अर्थ आणी संदर्भांचे स्पष्टीकरण दिल्यामुळे वाचकांना सगळी माहिती सहजपणे समजून घेता येते.

View full details