Poirot Investigates by Agatha Christie
Poirot Investigates by Agatha Christie
एक सिनेतारका आणि तिचा मौल्यवान हिरा यांच्याबद्दलचं रहस्य आधी होतंच... पण नंतर झाली एक आत्महत्या, आणि नंतर उघडकीस आलं की ती आत्महत्या नव्हतीच; तो होता खून... त्या नंतर एका अतिशय स्वस्तातल्या सदनिकेचं रहस्य... हत्यारांच्या बंद खोलीत झालेला संशयास्पद मृत्यू... दशलक्ष पौंड किमतीच्या बॉण्ड्सची चोरी... कैरोच्या कबरीचा शाप... समुद्रकाठी झालेली बहुमोल रत्नांची चोरी... पंतप्रधानांचं झालेलं अपहरण... एका बँकेच्या अधिकार्याचं नाहीसं होणं... मरणोन्मुख माणसाचा आलेला फोन आणि शेवटी बेपत्ता झालेल्या मृत्युपत्राचं रहस्य.
या सर्व रहस्यमय घटनांना जोडणारा दुवा म्हणजे हर्क्युल पायरोची कुशाग्र बुद्धीच!
‘अशा या रहस्यमय घटनांची गुंफण फार चातुर्यानं केलेली आहे आणि हलक्याफुलक्या शैलीत वाचकांना खिळवून टाकणार्या पद्धतीनं रहस्य उलगडत नेलेलं आहे.’
- लिटररी रिव्ह्यू