Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

PARVANA JAGANYACHA by PRIYA KUMAR

PARVANA JAGANYACHA by PRIYA KUMAR

Regular price Rs. 224.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 224.00
Sale Sold out
Author
Publication
Language
"‘लायसेन्स टु लिव्ह’ ही एक स्फूर्ती देणारी थरारकथा आहे. ज्याला स्वतःची प्रगती करायची आहे, अशा व्यक्तीचा स्वतःमधील मोठेपणाचा शोधप्रवास आहे हा. ज्या दिशेने तुमची प्रगती होण्याचे नियतीने ठरवले आहे ते शोधून आपल्या मनाप्रमाणे हवे ते प्राप्त कसे करता येते, याचे सुंदर वर्णन करणारी ही कथा आहे. एक यशस्वी उद्योजक जगताची शिक्षक योगायोगाने यशाचा मार्ग दाखवणाऱ्या एका जगप्रसिद्ध प्रशिक्षकाने आयोजलेल्या कार्यशाळेत दाखल होते. तेव्हा होणाऱ्या, तिचे आयुष्य संपूर्णपणे बदलून टाकणाऱ्या प्रवासाचे वर्णन या पुस्तकात आहे. सात दिवसांच्या या कार्यशाळेत तिचा प्रवास तीन देशांत होतो. त्या वेळी तिला आत्मशोध घ्यावा लागतो, आत्मपरीक्षण करावे लागते, स्वतःच स्वतःचा गुरू आणि मार्गदर्शक व्हावे लागते. इतरांना तसे वागायला ती उत्तम रीतीने शिकवत असे; पण स्वतःच्या बाबतीत तिने हा मंत्र वापरून पाहिला नव्हता. वाचक तिच्या या प्रवासात सामील होतो आणि अनेक धडे शिकतो. त्याच्या आयुष्यात बदल होण्यास, सतत आत्मपरीक्षण करण्यास तो त्यामुळे उद्युक्त होतो. आपल्या विद्यार्थ्याला जे ज्ञान सर्वांत जास्त आवश्यक आहे, ते त्याला शिकू देईल, शिकवेल तोच खरा शिक्षक. या दृष्टिकोनातून कुर्ट अतिशय उत्तम प्रशिक्षक होता. ‘जगण्याचा परवाना’ हे पुस्तक प्रत्यक्ष वास्तव जगात कसे वावरावे याची माहिती सांगते व त्याच्याआधी जगाच्या वास्तवाची ओळख करून देते. या वास्तव जगात चांगले आणि आणि वाईट यांची बेमालूम सरमिसळ झालेली दिसेल. तसेच समजूतदार, शहाण्या लोकांबरोबरच भ्रमिष्टपणाचे कातडे पांघरलेल्या लोकांचा भरणा सापडेल. तुम्हाला क्षणात योग्य मार्ग सापडेल, तर काही वेळाने तुम्ही भरकटत आहात असे वाटेल. या सर्वांमधून नियतीने तुमच्यासाठी आखलेला मार्ग शोधून काढून तुमची आयुष्याबद्दलची स्वप्ने योग्य प्रकारे प्रत्यक्षात उतरवायची कशी, हे या पुस्तकात सांगितले आहे. तुम्हाला न समजणाऱ्या लोकांबरोबर कसे निभावून न्यायचे, आपल्या नियंत्रणात नसलेल्या पेचप्रसंगांतून कसा मार्ग काढायचा आणि हे करता करता आपण त्यातून कसे प्रगल्भ व्हायचे, हे या पुस्तकावरून समजेल. तुमच्या रोजच्या जीवनातील निवड करताना, निर्णय करताना तुमची अध्यात्मिक वृत्ती त्यात कशी प्रकट होईल, याबद्दल हे पुस्तक आहे. काही वेळा आपल्याला आपले इतरांशी असलेले बंध दिसत नाहीत. आपल्या कृतीचा इतरांवर काय परिणाम होईल याचा आपण बऱ्याच वेळा विचारच केलेला नसतो; पण आपला इतरांशी काहीच संबंध नाही असे समजणे आणि आपल्याच विश्वात मग्न असणे, हे चुकीचे आहे. इतरांच्या दृष्टीने आपण कःपदार्थ आहोत असे समजणे चूक आहे. आपले अस्तित्व, आपल्या कृती इतरांच्या दृष्टीने निश्चित महत्त्वाच्या आहेत "
View full details