Pali Mili Gupchili (पाळी मिळी गुपचिळी) by Dr Shantanu Abhyankar
Pali Mili Gupchili (पाळी मिळी गुपचिळी) by Dr Shantanu Abhyankar
स्त्री म्हणजे समाजव्यवस्थेचा जणू कणाच! आज 21व्या शतकात अनेकविध क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर लीलया वावरणार्या स्त्रियांच्या आरोग्याचा सर्वंकष आढावा घेणारे हे पुस्तक आहे. स्त्रीआरोग्याचा मूलभूत घटक असणारी मासिक पाळी इथपासून ते अगदी वंध्यत्वादी घटकांच्या बाबतीत समाजामध्ये अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. त्यांचे निराकरण लेखकाने पुस्तकात केले आहे. त्या अनुषंगाने कुटुंबनियोजनाची साधने, स्त्री-भ्रूणहत्या, प्रेग्नन्सी आणि त्या दृष्टीने ध्यानात घेण्याजोग्या महत्त्वपूर्ण बाबी तसेच गर्भसंस्कार यांसारख्या अगदी कळीच्या प्रश्नांना लेखकाने स्पर्श केला आहे. डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी पूर्णत: वैद्यकशास्त्रीय दृष्टिकोनातून; परंतु सोप्या भाषेत स्त्री-आरोग्याचा समग्र आढावा घेतला आहे. स्त्रियांची सर्वार्थाने ‘सखी’ म्हणता येईल, असे हे पुस्तक प्रत्येक स्त्रीच्या संग्रही असायलाच हवे. प्रत्येक स्त्रीने नवर्याला भेट द्यावे असे पुस्तक. प्रत्येक डॉक्टरने पेशंटला भेट द्यावे असे पुस्तक. समाजाने स्त्रीला घातलेली ‘पाळी मिळी गुपचिळी’ सोडायला लावणारे पुस्तक.