Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Mahatma Gandhijinche Anmol Vichar by Santosh Lembhe

Mahatma Gandhijinche Anmol Vichar by Santosh Lembhe

Regular price Rs. 113.00
Regular price Rs. 125.00 Sale price Rs. 113.00
Sale Sold out
Condition
Language
Publication
२१ व्या शतकातील विज्ञान यंत्र-तंत्रज्ञान, खुली बाजारपेठ संस्कृती, पर्यावरणाचा ऱ्हास, नैसर्गिक संकटे, हिंसाचार, दहशतवाद, बहुराष्ट्रीय कंपन्यांची अर्थसत्ता यासंबंधी प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण जग पुन्हा गांधी विचारांकडे वळते आहे. ‘महात्मा गांधीजींचे अनमोल विचार’ हे पुस्तक यासाठी महत्त्वाचे आहे. प्रस्तुत पुस्तक म्हणजे महात्मा गांधीजींच्या थोर विचारांचा संग्रहच. या पुस्तकात सत्य, अहिंसा, स्वदेशी याबरोबरच शांती, श्रम, शेतकरी, ब्रह्मचर्य, विवाह, संततिनियमन, स्त्रिया, शिक्षण, अस्पृश्यता इ. विषयांवरचे निवडक सुविचार स्वतंत्र स्वरूपात संकलित केले आहेत. त्यांचे सत्य, अहिंसा, स्वदेशी, सत्याग्रह याविषयीच्या विचारांना जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ या तत्त्वानुसार ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच स्वातंत्र्य, समता, बंधुता टिकवून ठेवण्यासाठी वेचले त्यांचे महान विचार म्हणजे आजच्या जगण्याचे तत्त्वच म्हणावे लागेल. आपल्या उन्नतीबरोबरच आपल्या बांधवांची, समाजाची प्रगती कशी साधता येईल याबाबत हे पुस्तक मार्गदर्शन करते.
‘गांधी’ नावाची वावटळ शांत होऊन इतकी वर्षे झालीत, तरीही त्यांचे हे विचार स्थळ-काळाच्या बंधनापलीकडचे आहेत. गांधीजींच्या त्रिकालाबाधित, शाश्वत विचारांचे स्मरण, मनन व त्यांचे जीवनात अंमलबजावणी करण्याचे महत्त्व प्रत्येक पिढीला एक नवा मार्ग दाखवेल अशी आशा वाटते.
View full details