La Pest by Albert Camus
La Pest by Albert Camus
Regular price
Rs. 399.00
Regular price
Rs. 430.00
Sale price
Rs. 399.00
Unit price
per
फ्रेंच भाषेतील ‘ला पेस्त’ (द प्लेग) ही वैश्विक साहित्यातील एक श्रेष्ठ कलाकृती मानली जाते.
प्लेगसारख्या संसर्गजन्य साथीच्या रोगाच्या रूपकाची योजना काम्यूने केली आहे. एका बाजूला रोगराईसदृश उपद्रवी लोक व दुसर्या बाजूला पीडित लोक यांतून विसाव्या शतकात गलिच्छ ‘सत्ताकारणीय प्लेग’ने जिथेतिथे धुमाकूळ घातला होता, हे लेखकाने ह्या कादंबरीतून स्पष्ट केले आहे.
प्लेगशी करायचा सामना प्रार्थनेने नव्हे; तर कृतीने जिंकायचा आहे, असे काम्यू म्हणतो. दु:ख आणि मृत्यूच्या दहशतीचे ‘ला पेस्त’मध्ये प्रातिनिधिक चित्रण आहे. काम्यूच्या संपूर्ण तत्त्वचिंतनाचा गाभा ह्या कादंबरीत उतरला आहे.
ही कादंबरी मानवी अस्तित्वाच्या अर्थाचा, विविध आधिभौतिकतेचा प्रश्न निर्माण करते. तसेच नैतिक, परंतु अतीव दु:खद अशी अनेक प्रश्नचिन्हे निर्माण करते.
‘ला पेस्त’ ही एक वैश्विक बोधकथा आहे. इतकी वर्षे ती वेगवेगळ्या प्रकारे अनेकांशी बोलत राहते. यामुळेच तिचे नाव अक्षरवाङ्मयात कायम टिकून राहणार आहे.
ला पेस्त । आल्बेर काम्यू अनु. जयंत धुपकर । पद्मगंधा प्रकाशन