Gondankhuna by Dr. Priya Pradip Nighojkar
Gondankhuna by Dr. Priya Pradip Nighojkar
एखाद्या संवेदनशील स्त्रीनं आपल्या जाणत्या सखीला कधी मनोगत तर कधी हृद्गत सांगावं, तसा या 'गोंदणखुणा' - चा आशय आहे. निसर्गातील एखाद्या घटकाचा अनपेक्षित साक्षात्कार, मानवी स्वभावातील अतर्क्य भावनाट्य, रुणझुणत्या कवितेच्या चरणाशी सहज घडलेला अर्थमेळ, स्त्री-संवेदनेशी जोडलेल्या घटना-प्रसंगांची चलतचित्र किंवा जीवनाच्या एखाद्या प्राणसूत्राचं स्वतःला निःसंदर्भ करून केलेलं आत्मचिंतन - अशा अनेक आशयसूत्रांची स्मरणी या लेख- संग्रहात आहे. त्यात क्षणात आपला आकार बदलणाऱ्या मेघांचं दर्शन आहे; तसंच शांतनिवांत आकाशाचं सूचक निःशब्दपणही आहे. अंतर्याम आणि भवताल यांतील तरल रेषा विरून जावी इतकी अनुभवाला सामोरं जाण्याची सिद्धता निघोजकरांकडे आहे. सुजाण वाचक 'गोंदणखुणा' पाहतील, नव्या दृष्टीनं पाहतील असा भरवसा वाटतो. हेमकिरण पत्की