Cyber Attack by Dr. Sanjay Tungar
Cyber Attack by Dr. Sanjay Tungar
बिनचेहऱ्याच्या व्यक्तीने फेकलेले जाळे आणि त्याला लावलेली वेगवेगळी आमिषे. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत अनेकजण यात सहजपणे अडकतात. लोन फ्रॉड, एटीएम क्लोन, ऑनलाईन गेमिंग, घसघशीत उत्पन्नाची लालूच दाखवणारे प्रीपेड टास्क, कार्ड फ्रॉड, फिशिंग, इन्व्हॉईस फ्रॉड... एक ना दोन, अनेक प्रकार. सायबर फ्रॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बनवाबनवीत आपले बँकखाते एका झटक्यात रिते होते. मोबाईलवरून किंवा सोशल मीडियातून मिठ्ठास संवाद साधून अनेकांना जाळ्यात अडकवणाऱ्या या ठकसेनांपासून स्वत:चा बचाव करायचा एकच मार्ग - सजग राहणे, या जाळ्यात न अडकणे. त्यासाठीच हे पुस्तक वाचायचे आणि त्यामधून योग्य ते धडे घ्यायचे, सावधपणे पुढच्या हाका आधीच ऐकायच्या ! आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोहक मुखवट्याआडचा भेसूर चेहरा दाखवणारे - सायबर गुन्ह्यांबाबत सर्वांना सतर्क बनवणारे -