Chavhani Shamsher (चव्हाणी समशेर) By Laxman Narayan Joshi
Chavhani Shamsher (चव्हाणी समशेर) By Laxman Narayan Joshi
द्वापारयुगातील भीमार्जुनाप्रमाणे ज्यांचा पराक्रम होता, स्वधर्म संरक्षण हेच त्यांचे ब्रीद होते, स्वदेशाच्या शत्रूला नामशेष करण्यासाठी ज्यांनी आपल्या हाती शस्त्र धरले होते, घोरीसारख्या परधर्मीय अघोर शत्रूला ज्यांनी उदार अंत:करणाने आणि खऱ्या आर्यब्रीदाला शोभेल अशा प्रकारे त्याचा पाडाव झाला असताही- आपल्या दरबारी वागविले, आपसांतील दुही मोडण्यासाठी ज्यांनी स्वकीय शत्रूपुढे मोठ्या संतोषाने पड खाण्याचा स्वबांधवांकरिता प्रयत्न केला आणि ज्यांनी अंत: कलहाची राखरांगोळी व्हावी म्हणून आपल्या सार्वभौमादी अधिकारांचाही त्याग करण्याचे योजिले; त्या अतुल पराक्रमी पृथ्वीराजांचे चित्र या पुस्तकात रेखाटण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो कितपत साधला याचा परीक्षा वाचकवर्ग करीलच.