Atal Dukhatun Savartana अटळ दुःखातून सावरताना By sanjot Deshpande
Atal Dukhatun Savartana अटळ दुःखातून सावरताना By sanjot Deshpande
जन्मापासून अखंड सोबत करणार्या मृत्यूला सामोरं जाणं मानवी मनाची कसोटी पाहतं.
त्यात मृत्यूने आगमनाची पूर्वसूचना-तीही थोडी आधीच-दिल्यास त्याला स्वीकारणं सोपं जातं. मृत्यूने अचानक येऊ नये, तो आला तरीही, विशेष त्रास न देता शांतपणे यावा, तो वेदनारहित असावा किंवा वेदना अपरिहार्य असल्यास त्याने सुसह्य
वेदनांसह यावं, सर्व प्रिय, आप्त सोबत असताना यावा या व अशा अनेक अटी आपण मृत्यूसमोर दिवसरात्र ठेवत असतो. जगणं जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यू जाणून घेणं राहूनच जातं. आपल्या व आपल्या जवळच्या माणसाच्या मृत्युपूर्व दु:खाची परिमाणं समजून घेण्यासाठी विवेकी आंतरिक संवादाची गरज असते.
नेमका हा संवादच मृत्युपूर्व दु:खातील कोलाहलात राहून जातो. मग वेदनेसोबत
येणारं दु:ख अनाकलनीय होत जातं. मृत्युपूर्व अस्वस्थता, प्रत्यक्ष मृत्यू, त्यानंतर काळजीवाहकाला वाटणारं दु:ख हे सारं समजून घेण्याऐवजी टाळण्याकडे आपला कल वाढत
जातो. मग दु:खाची कधी न सुटणारी निरगाठ होऊन बसते. त्यातून मागे उरलेल्यांचं
मन:स्वास्थ्य हळूहळू बिघडू शकतं. घटना केव्हाच भूतकाळात वाहून गेलेली असते;
मागे रेंगाळत राहते, जीवनाला ग्रासून टाकणारी असह्य अस्वस्थता!!
अशा वेळी - खरंतर त्याही आधी डॉ. संज्योतचे हे विवेकनिष्ठ, मृदू,
संवेदनशील, सहजसोपे विवेचन समजून घेणे संजीवक ठरू शकेल.
मराठी साहित्यात मानसशास्त्र समजावून देणार्या ह्या पुस्तकाने मोलाची भर पडेल,
यात शंका नाही.
- डॉ. प्रदीप पाटकर, मनोविकारतज्ज्ञ